कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान यांचे ५ फायदे!

१९४० पासून संगणकाची प्रगती होत आहे आणि ती आता उच्चांक गाठत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय या तंत्रज्ञानाच्या शोधामुळे अनेक कठीण गोष्टी सोप्या होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्येक क्षेत्रात आपले यश दर्शवत आहे. मजकूर लिहिण्यापासून ते गाण्याला चाल लावण्यापर्यंत सर्वच सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता हाताळू शकत आहे. परंतु वैद्यकीय क्षेत्रात मात्र एआयने उच्चांक गाठला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान हा आपला आजच्या लेखाचा विषय आहे. परंतु रुग्णांना सल्ला देण्यापासून ते ऑपरेशन अगदी सहजरित्या हाताळण्यापर्यंत एआयची प्रगती झाली आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमान प्राण्यांशी संबंधित कार्ये करण्याची, संगणकाद्वारे नियंत्रित असलेली संगणकाची किंवा रोबोची क्षमता होय. मशीनला मानवी बुद्धिमत्तेसारखे तर्क करण्याची आणि स्वायत्त निर्णय घेण्याची क्षमता यात देण्यात येते. यामुळे वैद्यकीय सेवा अधिक सुलभ, प्रभावी, आणि अचूक बनत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान याचे महत्व:

१) वैद्यकीय तपासणी:

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली वैद्यकीय इमेजिंगमध्ये म्हणजेच एक्स रे, सिटी स्कॅन आणि एमआरआय यांमध्ये वापरण्यात येते. ही तपासणी शरीरातील फ्रॅक्चर किंवा ट्युमर तपासतात आणि या तंत्रज्ञानामुळे मानवी तपासणीद्वारे होणाऱ्या चुका टाळता येतात. 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान

२) अचूक निदान:

चुका या माणसांकडूनच होतात, तंत्रज्ञानात जे काही इनपुट्स टाकले जातात त्यानुसार ते योग्य कार्य करत असते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तपासणी आणि त्यावरील निदान हे अगदी अचूक असते. तसेच रोबोटला काम करण्यास वेळ लागत नाही यामुळे निदान देखील जलद गतीने मिळणे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान यामुळे शक्य झाले आहे. 

३) रुग्णांच्या आरोग्याचा ट्रॅक ठेवणे:

कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या आरोग्याबाबत प्रत्येक गोष्ट ट्रॅक करते आणि त्यानुसार आपल्याला अलर्ट करते किंवा उपचार सुचवते. आपल्या आरोग्याबाबत प्रत्येक रिपोर्ट एआयकडे साठवला जातो आणि त्यामुळे पुढील उपचार पद्धती सुचविण्यास ते मदत करत असते. 

४) पर्सनलाइझ्ड मेडिसिन:

५) रोगांचा अनुमान:

आपल्या नियमित दिनचर्येद्वारे आणि रोजच्या हेल्थ रिपोर्टनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आपल्या रोगांचा पूर्वानुमान लावू शकते. आपल्या अलर्ट करून ते आपल्याला याबाबतीत काही उपचार देखील सुचवू शकते. 

६) पैशांची बचत:

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान प्रणालीच्या आधारे घरच्या घरी तपासणी करणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे रुग्णांना प्रत्येकवेळी डॉक्टरांना भेट देण्याची गरज उरत नाही आणि त्यामुळे रुग्णांचा डॉक्टरांची फी तसेच येण्याजाण्याचा खर्च वाचतो. अशाप्रकारे या प्रणालीचा वापर करून पैशांची बचत करता येते. 

७) तज्ज्ञांचा साहाय्यक:

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय चा वापर केल्याने तज्ज्ञांचे काम अत्यंत सहज सोपे झाले आहे. औषधे सुचवण्यापासून ते उपचार करेपर्यंत सर्वच कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान तज्ज्ञांना मदत करत असते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान च्या मदतीने डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात रुग्णांकडे लक्ष देण्यास वेळ मिळतो, त्यामुळे रुग्णवाढ होते आणि तज्ज्ञांची म्हणजेच डॉक्टरांची व्यवसातिक क्षमता वाढीस लागते. 

८) नवीन उपचारांचा शोध:

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रणाली मोठ्या प्रमाणावर डेटा विश्लेषण करते आणि यामुळे नवीन उपचार पद्धती देखील ते सुचवू शकतात. अशाप्रकारे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI च्या आधाराने अजून प्रगती होणे शक्य आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान याचे तोटे:

१) गोपनीयता आणि सुरक्षा:

कृत्रिम बुद्धिमत्ता हे रुग्णांचा संपूर्ण आरोग्य डेटा आपल्याकडे साठवून ठेवत असतो आणि तो तिथेच सेव्ह होतो. यामुळे रुग्णांच्या हेल्थ रिपोर्ट बाबतीत गोपनीयता ठेवणे कठीण असून त्यांच्या सुरक्षेबद्दल काहीच हमी देता येत नाही. 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान

२) मानवी डॉक्टरांचा सहयोग:

कृत्रिम बुद्धिमत्ता हे काही मानव नाही तर एक मशीन आहे. ते आपल्याला मानवी स्पर्श करून निदान जाणून घेऊ शकत नाहीत, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला देखील खूप महत्वाचा ठरतो. तसेच डॉक्टर देखील या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान प्रणालीवर अवलंबून राहू शकत नाही.

३) तंत्रज्ञानाचा खर्च:

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रणाली विकसित करण्यासाठी त्याला नेहमी अपडेट ठेवणं महत्वाचं असतं आणि हा खर्च प्रत्येक रुग्णालयाला किंवा रुग्णांना परवडेलच असं नाही. 

४) रुग्णांचा विश्वास गमावणे:

काही रुग्णांपर्यंत अजूनही ही प्रगती पोहोचली नाही, त्यामुळे त्यांना यावर विश्वासही बसत नाही. काही रुग्णांचा मानवी स्पर्श आणि मानवी उचार यांच्यावर विश्वास असल्याने जे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान प्रणालीचा वापर करत आहेत ते रुग्णांचा विश्वास गमावू शकतात. 

कृत्रिम बुद्धिमत्ता एआयद्वारे विज्ञान प्रगत होत आहे, परंतु सर्वस्वी त्यावर अवलंबून राहणे तज्ज्ञांसाठी आणि रुग्णांसाठी देखील धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. 

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमान प्राण्यांशी संबंधित कार्ये करण्याची, संगणकाद्वारे नियंत्रित असलेली संगणकाची किंवा रोबोची क्षमता होय. मशीनला मानवी बुद्धिमत्तेसारखे तर्क करण्याची आणि स्वायत्त निर्णय घेण्याची क्षमता यात देण्यात येते. यामुळे वैद्यकीय सेवा अधिक सुलभ, प्रभावी, आणि अचूक बनत आहे.

कृत्रिम तंत्रज्ञान (AI) व्यवसायाच्या दृष्टीने कसे फायदेशीर ठरते?

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय चा वापर केल्याने तज्ज्ञांचे काम अत्यंत सहज सोपे झाले आहे. औषधे सुचवण्यापासून ते उपचार करेपर्यंत सर्वच कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान तज्ज्ञांना मदत करत असते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित निदान च्या मदतीने डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात रुग्णांकडे लक्ष देण्यास वेळ मिळतो, त्यामुळे रुग्णवाढ होते आणि तज्ज्ञांची म्हणजेच डॉक्टरांची व्यवसातिक क्षमता वाढीस लागते.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे केलेली तपासणी अचूक असते का?

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली वैद्यकीय इमेजिंगमध्ये म्हणजेच एक्स रे, सिटी स्कॅन आणि एमआरआय यांमध्ये वापरण्यात येते. ही तपासणी शरीरातील फ्रॅक्चर किंवा ट्युमर तपासतात आणि या तंत्रज्ञानामुळे मानवी तपासणीद्वारे होणाऱ्या चुका टाळता येतात. 

Leave a Comment