टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर: काळाची गरज!

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे, त्याचप्रमाणे मेडिकल क्षेत्रातही टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर ही मोठी प्रगतीची बाब आहे. टेलिमेडिसिन द्वारे डॉक्टर तसेच रुग्णांना उपचार करण्यास अत्यन्त सोयीस्कर झाले आहे. टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर काळाची गरज ठरत आहे असे चित्र दिसत आहे. 

रूग्णांना वेळी-अवेळी तज्ज्ञांशी संपर्क साधणं अवघड होतं. काही इमर्जन्सी असल्यास तज्ज्ञांच्या वेळेअभावी उपचार मिळवणं अत्यंत कठीण जात असे. परंतु आता टेलिमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर यामुळे रुग्णांना इमर्जन्सी असल्यास तज्ज्ञांशी त्वरित संपर्क साधणं शक्य झालं आहे. कोरोना काळात या सोयीचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. टेलिमेडिसिन आणि डिजिटल आरोग्य सेवा म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया… 

टेलिमेडिसिन:

टेलीमेडिसिन म्हणजे दूरदर्शन, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांशी डॉक्टरांचा संवाद साधणे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात समोरासमोर संवाद न होता विविध डिजिटल उपकरणांचा वापर करून आरोग्य तपासणी, निदान, उपचार व सल्ला दिला जातो.

डिजिटल आरोग्य सेवा:

डिजिटल आरोग्य सेवा म्हणजे आरोग्य सेवा पुरवठ्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर. यामध्ये आरोग्य सेवेच्या नोंदींचे डिजिटायझेशन, ऑनलाइन डॉक्टर कन्सल्टेशन, आरोग्य तपासणीसाठी स्मार्ट उपकरणांचा वापर, वर्कआउट, डाएट प्लॅन्स यांचा समावेश होतो.

टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर

टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर याचे फायदे:

१) वेळेची बचत:

टेलिमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर यामुळे रुग्ण तसेच तज्ज्ञांच्या वेळेची देखील बचत होते. रुग्णांना इमर्जन्सीच्या वेळी प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते. अशावेळी टेलिमेडिसिनद्वारे रुग्ण तज्ज्ञांशी प्रवास न करता घरच्या घरी संपर्क साधू शकतात तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार मिळवू शकतात. तज्ज्ञांना देखील टेलिमेडिसिनमुळे आपल्या घरून किंवा क्लिनिकमधून रुग्णांना कन्सल्ट करणे शक्य होते. यावेळी टेलिमेडिसिनमुळे रुग्ण व तज्ज्ञ दोघांचाही वेळ वाचतो. 

२) पैशांची बचत:

टेलिमेडिसिनद्वारे रुग्ण घरबसल्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात आणि उपचार मिळवू शकतात. त्यामुळे तज्ञांपर्यंत जाण्याची गरज भासत नाही आणि त्यामुळेच प्रवास खर्च देखील वाचतो. 

३) तज्ज्ञांची निवड:

टेलिमेडिसिनचा अभाव असल्याकारणाने पूर्वी रुग्णांना आपल्या परिसरातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागत असे. परंतु आता ती मर्यादा टेलिमेडिसिनद्वारे पुसली गेली आहे. आपले उपचार कोणत्या तज्ज्ञांद्वारे व्हावे हे सर्वस्वी रुग्ण ठरवू शकतो. टेलिमेडिसिनच्या मदतीने कितीही दूर असलेल्या तज्ज्ञांशी रुग्ण त्वरित संपर्क साधू शकतो, तसेच फोन, व्हिडीओ कॉल, मेसेज याद्वारे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उत्तम उपचार मिळवण्यात रुग्ण यशस्वी ठरतो.

४) मेडिकल डाटा सेव्हिंग:

डिजिटल आरोग्य सेवेच्या मदतीने रुग्णांचा प्रत्येक मेडिकल रिपोर्ट डिजिटली सेव्ह करण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णांचा डाटा पुन्हा पुन्हा शोधण्याची गरज उरात नाही, तो डाटा एकाच ठिकाणी साठवला जातो. 

५) डिजिटल उपकरणे:

डिजिटल उपकरणे म्हणजेच स्मार्टवॉच किंवा फिटनेस ट्रॅकर्स वापरून रुग्णांचे हार्ट रेट, ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल सारख्या गोष्टींवर तज्ज्ञांना लक्ष ठेवणे सोपे होते.

६) त्वरित उपचार:

काही वेळा लोकांना तातडीने सल्ला घेण्याची आवश्यकता असते. डिजिटल सेवा किंवा टेलीमेडिसिनच्या माध्यमातून रुग्णाला लगेच मार्गदर्शन मिळू शकते.  

टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर यांचे तोटे:

१) इंटरनेटची अनुपस्थिती:

टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर

२) शारीरिक संपर्काचा अभाव:

तज्ज्ञांचा आपल्या रुग्णांचे आरोग्य तपासण्यासाठी शारीरिक संपर्क होणे आवश्यक आहे. त्याशिवाय काही रोगांचे निदान होत नाही. टेलिमेडिसिनमुळे घरच्या घरी रुग्णांना सल्ला देण्यात येतो. अशावेळी डॉक्टर रुग्णांच्या शरीराचे तापमान चेक करू शकत नाही तसेच ताप, ब्लड प्रेशर, मधुमेह चेक करण्यासाठीची उपकरणे रुग्णांना विकत घ्यावी लागत असतात. 

३) तंत्रज्ञानाचा अभाव:

टेलिमेडिसिनची गरज जास्तीत जास्त वयस्कर रुग्णांना पडत असते आणि काही रुग्ण अजूनही तंत्रज्ञानाशी इतके सुसंग झाले नसल्याचे आढळते. अशावेळी तंत्रज्ञान कसे हाताळावे हे माहित नसल्याने टेलिमेडिसिन तसेच डिजिटल आरोग्य सेवांचा वापर देखील त्यांना करता येत नाही आणि या सेवांपासून त्यांना लाभ मिळणे कठीण होऊन बसते. 

४) डाटा असुरक्षितता:

डिजिटल आरोग्य सेवांच्या माध्यमाने रुग्णांचा सर्व डाटा एका ठिकाणी साठवला जातो आणि तो ऑनलाईन उपलब्ध होतो. यामुळे रुग्णांचा व्यक्तिगत आरोग्य डाटाची सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. 

टेलीमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर हे एक प्रगत विज्ञान आहे. त्याचा वापर जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणं अत्यावश्यक आहे. यामुळे रुग्णांना त्वरित उपचार मिळणं अत्यंत सोयीस्कर होत आहे. 

टेलिमेडिसिन म्हणजे काय?

टेलीमेडिसिन म्हणजे दूरदर्शन, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांशी डॉक्टरांचा संवाद साधणे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात समोरासमोर संवाद न होता विविध डिजिटल उपकरणांचा वापर करून आरोग्य तपासणी, निदान, उपचार व सल्ला दिला जातो.

घरबसल्या डॉक्टरांचा सल्ला कसा मिळेल?

टेलिमेडिसिन व डिजिटल आरोग्य सेवांचा वापर यामुळे रुग्ण तसेच तज्ज्ञांच्या वेळेची देखील बचत होते. रुग्णांना इमर्जन्सीच्या वेळी प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते. अशावेळी टेलिमेडिसिनद्वारे रुग्ण तज्ज्ञांशी प्रवास न करता घरच्या घरी संपर्क साधू शकतात तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार मिळवू शकतात. तज्ज्ञांना देखील टेलिमेडिसिनमुळे आपल्या घरून किंवा क्लिनिकमधून रुग्णांना कन्सल्ट करणे शक्य होते. यावेळी टेलिमेडिसिनमुळे रुग्ण व तज्ज्ञ दोघांचाही वेळ वाचतो.

टेलिमेडिसिनचे तोटे कोणते?

तज्ज्ञांचा आपल्या रुग्णांचे आरोग्य तपासण्यासाठी शारीरिक संपर्क होणे आवश्यक आहे. त्याशिवाय काही रोगांचे निदान होत नाही. टेलिमेडिसिनमुळे घरच्या घरी रुग्णांना सल्ला देण्यात येतो. अशावेळी डॉक्टर रुग्णांच्या शरीराचे तापमान चेक करू शकत नाही तसेच ताप, ब्लड प्रेशर, मधुमेह चेक करण्यासाठीची उपकरणे रुग्णांना विकत घ्यावी लागत असतात. 

Leave a Comment