सेंद्रिय आहार व औषधे: आरोग्यदायी प्रकृतीस महत्वपूर्ण!

सेंद्रिय आहार व औषधे

सेंद्रिय आहार व औषधे:

सेंद्रिय आहार म्हणजे आपल्या आहारात रासायनिक, कीटकनाशकं आणि गंधक किंवा इतर हानिकारक पदार्थांचा वापर न करता उगवलेल्या पदार्थांचा समावेश करणे. सेंद्रिय शेती पर्यावरणपूरक व नैसर्गिकरित्या करण्यात येते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा केमिकल औषधे वापरली जात नाहीत. सेंद्रिय भाज्या, फळं, दूध, धान्य तसेच मासे या उत्पादनांचा यामध्ये समावेश होतो. 

आपल्या दैनंदिन जीवनात सेंद्रिय आहाराचा समावेश केल्यास आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचे रासायनिक तत्व न जाता अनेक पोषणतत्त्वे जसं की, मिनरल्स, फायबर्स, आयर्न तसेच सर्व प्रकारचे व्हिटॅमिन जात असते. यामुळे आपण स्वतःला अधिक ताजेतवाने भासतो. तसेच सेंद्रिय आहारामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीचे प्रमाण वाढीस लागते आणि त्यामुळे आपण अनेक जीवनशैली रोगांपासून दूर राहतो. सेंद्रिय पदार्थांमध्ये अधिक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी आवश्यक आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी केल्याने पर्यावरणावर कमी दुष्परिणाम होतो.

सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे आपल्या सर्वाचेच लक्षात येत आहे. यामुळे पर्यावरणाला वाचवण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. सेंद्रिय आहार हा पर्यावरण वाचवण्यासाठीचं पहिलं पाऊल ठरू शकतं. यामुळे पर्यावरणाचा बचाव तर होईलच, पण आपले आरोग्य देखील निरोगी होण्यास मदत होईल. आपल्या नियमित आहारात सेंद्रिय उत्पादने म्हणजेच नैसर्गिकरित्या उगवण्यात आलेल्या उत्पादनांचा वापर करावा.

सेंद्रिय उत्पादने कशी ओळखावीत?

सेंद्रिय पदार्थ आणि इतर पदार्थ एकसारखेच दिसतात. पण सेंद्रिय पदार्थांमध्ये सर्टिफाइड स्टिकर्स लावण्यात येत असून, त्यांची चवही इतर पदार्थांपेक्षा थोडी वेगळी असते. सेंद्रिय पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या मसाल्यांचा गंधही इतर मसाल्यांपेक्षा उग्र असतो. तसेच सेंद्रिय पद्धतीनं पिकवण्यात आलेल्या भाज्या इतर भाज्यांपेक्षा लवकर शिजतात. 

सेंद्रिय खाद्यपदार्थ ओळखण्यासाठी जैविक भारत बोधचिन्ह ही ओळख आहे. ‘जैविक भारत’ हे तळाशी असलेले बोधचिन्ह सेंद्रिय पदार्थांची ओळख देण्यास समर्थ आहे. एखाद्या प्रभावी संदेशासंदर्भात संवाद साधण्यासाठी सोपा दृष्टीकोन वापरुन लोगोचा हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे.

हे ‘जैविक खाद्य’ या शब्दामध्ये वापरल्या जाणार्‍या ‘ओ’ अक्षराला ठळकपणे दर्शविते. पानांमध्ये “ओ” अक्षराद्वारे दर्शविलेल्या वर्तुळाच्या आत चिन्हांकित स्वरूपात लोगो वापरले गेले आहेत. हा लोगो त्याचे उत्पादन वापराच्या निवडीसाठी सेंद्रिय म्हणून प्रमाणित केले गेल्याचे दर्शवतो. प्रत्येक प्रमाणित सेंद्रिय खाद्य वस्तू वर ‘जैविक  भारत’ बोधचिन्ह असावा. खरेदी करताना ग्राहकांनी हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. 

सेंद्रिय आहारामुळे आजारांपासून होतो बचाव!

सेंद्रिय उत्पादनात रसायन आणि अनैसर्गिक औषधे नसल्यामुळे शरीरात हानिकारक पदार्थ न जाता त्यातील जीवनसत्वे जात असतात. सेंद्रिय आहारात समाविष्ट असलेली पोषणतत्त्वे आपल्या शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. या केमिकलविरहित सेंद्रिय उत्पादनांमुळे कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, अति रक्तदाब, मायग्रेन या समस्यांपासून बचाव होतो. तसेच या पदार्थांमध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे त्वचेशी निगडित रोगही आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते. 

सेंद्रिय औषधे:

सेंद्रिय औषधांची निर्मिती नैसर्गिक घटकांपासून केली जाते. त्यात रासायनिक घटकांचा कमीत कमी वापर असू शकतो. या औषधांचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो आणि हे औषधे शरीरावर हलके प्रभाव टाकतात. सेंद्रिय औषधे प्रामुख्याने वनस्पती, खनिजे, प्राणी व इतर नैसर्गिक घटकांवर आधारित असतात.

पूर्वी प्राचीन भारत, चीन, ग्रीक, इजिप्त अशा ठिकाणी या सेंद्रिय औषधांचा वापर करण्यात येत असे. आयुर्वेद, आणि सिद्ध चिकित्सा या उपचारांमध्ये सेंद्रिय औषधांचा समावेश असतो. ही औषधे कमी प्रभाव टाकत असल्याने शरीरावर कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होण्याची शक्यता टळते. सेंद्रिय औषधांमध्ये प्राकृतिक घटक असल्याने ते प्रकृतीसाठी देखील हानिकारक नसते. या औषधांमार्फत आपल्या शरीरात रासायनिक घटक न जाता सेंद्रिय घटक जात असल्याने त्याचा लाभ होऊन प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ,तुळशी, हळद, अश्वगंधा इत्यादी वनस्पती देखील सेंद्रिय औषधांमध्ये मोडली जातात. 

सेंद्रिय औषधांचा वापर विविध प्रकारच्या रोगांवर केला जातो. हे औषध सामान्य ताप, सर्दी-खोकला, पचनसंस्था संबंधित समस्या, तणाव, आणि मानसिक विकारांवर उपयोगी पडतात. त्याचबरोबर, ते त्वचेचे विकार आणि इतर विविध शारीरिक समस्यांवरही उपयोगी ठरतात.

१) सेंद्रिय अन्न कसे ओळखावे?

सेंद्रिय खाद्यपदार्थ ओळखण्यासाठी जैविक भारत बोधचिन्ह ही ओळख आहे. ‘जैविक भारत’ हे तळाशी असलेले बोधचिन्ह सेंद्रिय पदार्थांची ओळख देण्यास समर्थ आहे. एखाद्या प्रभावी संदेशासंदर्भात संवाद साधण्यासाठी सोपा दृष्टीकोन वापरुन लोगोचा हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे.

२) सेंद्रिय औषधं कसे उपयोगी ठरतात?

सेंद्रिय औषधांचा वापर विविध प्रकारच्या रोगांवर केला जातो. हे औषध सामान्य ताप, सर्दी-खोकला, पचनसंस्था संबंधित समस्या, तणाव, आणि मानसिक विकारांवर उपयोगी पडतात. त्याचबरोबर, ते त्वचेचे विकार आणि इतर विविध शारीरिक समस्यांवरही उपयोगी ठरतात.

३) सेंद्रिय आहार व औषधे नियमित जीवनात समाविष्ट केल्याने काय फायदे होतात?

सेंद्रिय उत्पादनात रसायन आणि अनैसर्गिक औषधे नसल्यामुळे शरीरात हानिकारक पदार्थ न जाता त्यातील जीवनसत्वे जात असतात. सेंद्रिय आहारात समाविष्ट असलेली पोषणतत्त्वे आपल्या शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. या केमिकलविरहित सेंद्रिय उत्पादनांमुळे कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, अति रक्तदाब, मायग्रेन या समस्यांपासून बचाव होतो. तसेच या पदार्थांमध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे त्वचेशी निगडित रोगही आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते.

Leave a Comment