स्त्री आरोग्य: नियमित तपासणी आणि योग्य जीवनशैली आवश्यक!

पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती होती. पुरुष आर्थिक बाजू सांभाळायचे तर स्त्रिया घर-संसार सांभाळायच्या. ते युग आता संपल्यात जमा आहे. या युगात जवळजवळ प्रत्येक स्त्री आपल्या पायावर उभी आहे. सध्याची स्त्री घर-संसार तर संभाळतेच, सोबतच तिची आर्थिक बाजू देखील सक्षम बनवते. परंतु पूर्वी स्त्रियांना आराम मिळायचा. त्यांच्या हाती एकच काम असल्याने त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत असे, परंतु आजकाल घर आणि आर्थिक क्षेत्र या दोघांना सांभाळण्यात स्त्रियांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येते. यामुळे स्त्रिया स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीयेत, स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. परंतु याच बिझी शेड्युलमुळे स्त्रियांना ब्रेस्ट कँसर, गर्भाशयाचा कँसर तसेच डायबिटीज, उच्च रक्तदाब या गंभीर आजारांना सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे. हे सर्व टाळण्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

स्त्री आरोग्य

स्त्री आरोग्य: नियमित बदल

स्त्रियांमध्ये लहानपणापासून शारीरिक, हार्मोनल आणि मानसिक बदल घडत असतात. त्यामुळे स्त्रियांचे आरोग्य हे पुरुषांपेक्षा नाजूक असते आणि म्हणूनच स्त्री आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे. 

१) मासिक पाळी:

मासिक पाळी हा स्त्री आरोग्य यातील पहिला बदल असतो. प्रत्येक स्त्रीला काही विशिष्ट वयात मासिक पाळी सुरु होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. असमान मासिक धर्म चक्र, अत्याधिक रक्तस्राव किंवा वेदना या समस्या निरंतर होऊ शकतात आणि यावर उपचार आवश्यक आहे. 

२) गर्भावस्था व प्रसूती:

गर्भावस्थेदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो. गर्भवती महिलेसाठी योग्य आहार, विश्रांती आणि मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. गर्भावस्थेदरम्यान नियमित वैद्यकीय तपासणी, रक्त चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड तपासणी आवश्यक आहेत. प्रसूतीनंतर देखील स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषत: स्तनपानाच्या काळात.

३) पौष्टिक आहार:

स्त्री आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शियम, मिनरल्स, आयर्न, प्रोटीन आणि व्हिटॅमिन D यांनी युक्त अन्नपदार्थ आपल्या आहारात स्त्रियांनी नियमित समाविष्ट करावेत. ही पोषणतत्वे स्त्रियांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते. 

४) मानसिक आरोग्य:

स्त्री आरोग्य यामध्ये महत्वाचा घटक हा मानसिक आणि भावनिक आरोग्य आहे. मासिक पाळीत किंवा गर्भधारणेत स्त्रियांचे मूड स्विंग मोठ्या प्रमाणात होत असतात, यामुळे डिप्रेशन, मानसिक ताण, चिंता वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्याकाळात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. यासाठी योग, व्यायाम, ध्यान किंवा मानसिक आसन करणे स्त्रियांसाठी योग्य ठरेल. तसेच आपला आहार नेहमीपेक्षा जास्त पौष्टिक असावा याची काळजी घेणं गरजेचं आहे. 

५) स्त्रियांशी संबंधित कॅन्सर रोग:

स्त्रियांच्या शरीरातील काही भागांशी संबंधित कॅन्सर, उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर आणि ओव्हरी कॅन्सर असे विविध कॅन्सर स्त्रियांना होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबत वेळीच तपासणी आणि स्क्रीनिंग अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

नियमित तपासणी, सेल्फ-ब्रेस्ट चेकिंग आणि PAP स्मिअर टेस्ट यांचा वापर कॅन्सरच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी केला जातो.

६) रोजच्या जीवनातील महत्वपूर्ण काळजी:

स्त्रियांना आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आपली जीवनशैली आरोग्यदायी बनवणे गरजेचे आहे. आपल्या जीवनशैलीत व्यायाम, नियमित भरपूर पाणी पिणे, मनःशांतीसाठी योग्य करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आपल्या दिनचर्येत करणं गरजेचं आहे. स्त्रियांना धूम्रपान, मद्यपान अशा किंवा अनेक कॅफीनयुक्त पदार्थांपासून दूर राहणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. 

स्त्रियांनी आपल्या नियमित कामांसह स्त्री आरोग्य याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत चुकीचे आहे. नियमित चेकअप, पौष्टिक आहार, व्यायाम इत्यादी गोष्टी स्त्रियांना त्यांचे स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यास मदत करेल.

स्त्रियांशी संबंधित कॅन्सर कोणते?

स्त्रियांच्या शरीरातील काही भागांशी संबंधित कॅन्सर, उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर आणि ओव्हरी कॅन्सर असे विविध कॅन्सर स्त्रियांना होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबत वेळीच तपासणी आणि स्क्रीनिंग अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

स्त्रियांनी आपल्या नियमित कामांसह स्त्री आरोग्य याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत चुकीचे आहे. नियमित चेकअप, पौष्टिक आहार, व्यायाम इत्यादी गोष्टी स्त्रियांना त्यांचे स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यास मदत करेल. 

स्त्रियांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

स्त्री आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शियम, मिनरल्स, आयर्न, प्रोटीन आणि व्हिटॅमिन D यांनी युक्त अन्नपदार्थ आपल्या आहारात स्त्रियांनी नियमित समाविष्ट करावेत. ही पोषणतत्वे स्त्रियांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते.

Leave a Comment