मुलांचे आरोग्य सांभाळण्यासाठी या ४ घटकांची काळजी घ्यावी!

मुलांचे आरोग्य

मुलांचे आरोग्य सुदृढ होण्यास उपयुक्त घटक:


१) पोषक आहार:

मुलांचे शारीरिक आरोग्याचा पाया आहार हा असतो, त्यामुळे त्यांना नियमित पोषक आहार मिळणे हे त्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. त्यांच्या शरीरात आहाराद्वारे मिनरल्स, फायबर्स तसेच व्हिटॅमिन A, B, C, D जाणे त्यांच्या शारीरिक वाढीसाठी आणि शरीर आतून मजबूत होण्यासाठी महत्वाचे आहे. पोषक आहारामुळे मुलांची वाढ योग्यरीत्या होत असते, त्यांच्या हाडांची मजबुती वाढते तसेच प्रतिकारक शक्ती वाढीस लागते. 


मुलांना वेळच्या वेळी पोषक आहार न मिळाल्याने त्यांची वाढ खुंटते. काही वेळा मुलं जेवण टाळतात तर कधी त्यांचे जेवणाकडे लक्ष नसते. पोषक आहार न मिळाल्याने शरीरातील प्रतिकारक शक्ती दुर्बल राहते. हाडं मजबूत होण्यास सकस आहाराची गरज असते. यावेळी मुलांमध्ये पोलिओसारखे अनेक रोग होण्याची संभावना असते. त्यामुळे मुलांना पौष्टिक आणि वेळच्या वेळी आहार देण्याकडे पालकांचं लक्ष असणं अत्यावश्यक आहे.


२) पाणी पिणे


शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलं सामान्यत: खेळताना किंवा शाळेत असताना याकडे अधिक दुर्लक्ष करू शकतात, त्यामुळे त्यांना पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. शरीरात पाणी कमी होणे (डिहायड्रेशन) हानिकारक ठरू शकते.

 
३) व्यायाम:

मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांसाठी देखील व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे. सध्याच्या काळात मुलांचा कल प्ले स्टेशन, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी उपकरणांकडे वेधला गेला आहे. त्यामुळे मैदानी खेळांमध्ये सध्याच्या पिढीला रस नाही आणि व्यायाम तर ते टाळण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्यांचं शरीर सक्रिय राहणं त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. व्यायाम तसेच मैदानी खेळ मुलांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास समर्थ ठरतात. व्यायाम न केल्याने त्यांच्या शरीराची तसेच बुद्धीची वाढ खुंटण्याची शक्यता आहे. मुलांनी नेहमी सक्रिय राहावे यासाठी प्रत्येक पालकांनी प्रयत्न करावे. 


सध्या पालकांच्या व्यस्त जीवनशैलीत मुलांकडे लक्ष देण्यास ते असमर्थ ठरतात आणि मुलांच्या हातात उपकरणं देऊन त्यांना एका जागी शांत बसण्यास सांगतात, परंतु हे मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत घातक ठरेल याची कल्पना प्रत्येक पालकांना असायला हवी. 

४) पुरेशी झोप:

मुलांचे आरोग्य सुदृढ असावे यासाठी त्यांना पुरेशी झोप मिळणे गरजेचे आहे. झोपेमुळे शरीराची ऊर्जेचा संचय होतो आणि मानसिक शांती मिळते. वयाच्या प्रमाणे मुलांची झोपेची आवश्यकता असते, त्यामुळे प्रत्येक वयातील मुलांसाठी योग्य वेळेची झोप घ्यायला शिकवावी. मागील लेखात आपण प्रत्येक वयासाठी झोपेचे प्रमाण पहिले होते. त्यामुळे कोणत्या वयात मुलांना किती झोप पुरेशी आहे त्याची माहिती पालकांना असायला हवी आणि त्याप्रमाणे मुलांना पुरेशी झोप मिळत असल्याची खात्री पालकांनी करून घ्यावी. 
पुरेशी झोप न मिळाल्याने मुलांची चिडचिड वाढून त्यांचा बौद्धिक विकास होण्यास अडथळा येऊ शकतो. त्यांची एकाग्रता, अभ्यासू वृत्ती यावर परिणाम होऊ शकतो. 


मुलांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व त्यांची वाढ योग्यरीत्या होण्यासाठी त्यांच्या आहारात ताजी फळे, दूध, शुद्ध पाणी, भाज्या, मांसाहारी पदार्थ असे सर्व जीवनसत्व युक्त अन्नाचा समावेश करावा. तसेच त्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी त्यांना विविध खेळ, व्यायाम तसेच वाचन करणे देखील उपयुक्त ठरेल. ही सर्व काळजी घेतल्यास मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल नक्कीच घडेल. 

मुलांचे आरोग्य कोणत्या माध्यमातून जपावे?

मुलांचे शारीरिक आरोग्याचा पाया आहार हा असतो, त्यामुळे त्यांना नियमित पोषक आहार मिळणे हे त्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. त्यांच्या शरीरात आहाराद्वारे मिनरल्स, फायबर्स तसेच व्हिटॅमिन A, B, C, D जाणे त्यांच्या शारीरिक वाढीसाठी आणि शरीर आतून मजबूत होण्यासाठी महत्वाचे आहे.

मुलांची वाढ कशी होते?

मुलांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व त्यांची वाढ योग्यरीत्या होण्यासाठी त्यांच्या आहारात ताजी फळे, दूध, शुद्ध पाणी, भाज्या, मांसाहारी पदार्थ असे सर्व जीवनसत्व युक्त अन्नाचा समावेश करावा. तसेच त्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी त्यांना विविध खेळ, व्यायाम तसेच वाचन करणे देखील उपयुक्त ठरेल. ही सर्व काळजी घेतल्यास मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल नक्कीच घडेल.

मुलांचे आरोग्य महत्वाचे का आहे?

मुलांच्या वाढत्या वयात त्यांची शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ देखील होत असते. अशावेळी पालकांनी त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Leave a Comment