मानसिक आरोग्य स्वस्थ आहे किंवा नाही ओळखा या ३ गोष्टींवरून!


आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे किंवा नाही हे आपल्याला काही लक्षणांद्वारे लक्षात येतं. अशावेळी त्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर उपाय करावे किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नाहीतर भयंकर तसेच उपाय नसलेले आजार होण्याची संभावना निर्माण होते. 

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे:

१) झोप:

मानसिक आरोग्य सुदृढ असल्यास आपली झोप पुरेशी होत असते. याउलट जर आपले मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल तर झोप लागत नाही किंवा झोप पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. नियमित वेळेला आणि शांत झोप लागणे तसेच ७-८ तासांच्या पूर्ण झोपेनंतर स्वतःहून जाग येणे हे मानसिक आरोग्य चांगलं असण्याची लक्षणे आहेत. निद्रानाश, अस्वस्थ झोप, अति झोप येणे किंवा झोप पूर्ण झाल्यावरही थकवा जाणवणे ही सर्व लक्षणे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची सूचना देत असतात. ही लक्षणं जर आपल्याला आपल्यात दिसत असतील तर हे काळजीचे कारण ठरू शकते. 

२) भूक:

आपले मानसिक स्वास्थ्य जर उत्तम असेल तर आपल्याला योग्य वेळी आणि पुरेशी भूक लागते. आणि जेवल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. परंतु जर मानसिक स्वास्थ्य बिघडले असेल तर मात्र अन्नावरील वासना उडणे, अजिबात भूक न लागणे किंवा मग जेवण होऊन सुद्धा सतत खावंसं वाटणे या सर्व गोष्टी होत असतात. आपले मानसिक स्वास्थ्य सुदृढ नसल्याची ही लक्षणे आहेत. डिप्रेशन, हायपरटेन्शन अशा आजारांमुळे देखील आपल्या भूकेवर परिणाम होत असतो. या आजारांमध्ये रुग्णाला भूक लागत नाही, तो स्वतःहून कधीच जेवण मागत नाही. याउलट मेनिया किंवा स्किझोफेनिया या सारख्या आजारांमुळे भूक थांबत नाही, सतत खात राहावेसे वाटते आणि तरीही पॉट न भरल्याचे भासते. 

३) विचारशक्ती:

कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार करणे, मार्ग काढणे, कोणतीही परिस्थिती सहज हाताळता येणे हे सर्व आपली विचारशक्ती प्रबळ असल्याची लक्षणे आहेत. यामुळे आपण कोणतेही प्रॉब्लेम्स अगदी सहजरित्या हाताळू शकतो आणि त्या परिस्थितीतून बाहेर निघू शकतो. 


परंतु याउलट जर कोणत्याही वाईट परिस्थितीत लगेच घाबरणे, हात-पाय गळणे, वैचारिक गोंधळ निर्माण होणे, कोणत्याही परिस्थितीपासून लांब पळणे, विचार खुंटणे, सतत नकारात्मक विचार डोक्यात येणे हे सर्व मानसिक असंतुलन दर्शवते. 
आपल्यासमोर कोणतीही बिकट परिस्थिती आल्यास डळमळून न जाता काही व्यक्ती त्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढतात, ती परिस्थिती अगदी समर्थपणे हाताळतात. परंतु काही व्यक्ती सैरभैर होतात, त्यांना त्या परिस्थितीशी सामना करण्याचे सामर्थ्य नसते, ते गोंधळात पडतात व परिस्थितीशी सामना करण्याखेरीज ते पळ काढण्याचा प्रयत्न करीत असतात. अशावेळी त्यांचे वैचारिक आरोग्य असंतुलित असल्याचे निर्देशित होते. 


आपले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण घरच्या घरी अनेक उपचार करू शकतो ज्यामुळे आपण आपले शारीरिक स्वास्थ्य जपण्यास समर्थ ठरतो. 

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे?

१) व्यायाम: 

व्यायाम हा तणावमुक्तीचा उत्तम उपाय आहे. आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी नियमित किमान अर्धा तास व्यायाम करणे अत्यावश्यक असल्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे. यामुळे शरीराची हालचाल होत असते तसेच मनात सकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते. 

२) चांगला आहार आणि झोप:

आरोग्य सुधरवण्यासाठी मनावरील ताण तणाव बाजूला सारणे अत्यावश्यक आहे. मनावर किंवा बुद्धीवर वैचारिक ताण असल्याने आपल्याला नियमित भूक व झोप लागणे बंद होते. चांगला, पौष्टिक आहार व योग्य प्रमाणात झोप घेणे हा यावर चांगला उपाय आहे. 

३) सकारात्मक विचार:

मानसिक स्वास्थ्य बिघडले असता आपले विचार अत्यंत नकारात्मक होण्याची शक्यता असते. नकारात्मक विचार हे रुग्णांसाठी डिप्रेशन किंवा हायपरटेन्शनचे कारक ठरू शकतात. त्यामुळे सतत सकारात्मक विचार आपण सुरु ठेवले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. 

४) समाजाशी जोडलेले राहा: 

एकटे राहिल्याने आपल्यातील नकारात्मक उरक बळावते आणि त्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण समाजातील लोकांशी बोला, बाहेर फिरायला जा तसेच वातावरणात वेळ घालवा म्हणजे इतरांशी बोलून आपण आपले ताणतणाव हलके करू शकतो. यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक बदल नक्कीच होईल. 

मानसिक स्वास्थ्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वपूर्ण घटक आहे. प्रत्येकाचे मानसिक स्वास्थ्य निरोगी असणे हे मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. यामुळे आपण प्रत्येक परिस्थितीशी समर्थपणे लढू शकतो. 

मानसिक आरोग्य म्हणजे काय?

आपले जीवन आपल्याला आनंदाने घालवायचे असल्यास आपलं मानसिक आरोग्य चांगलं असणं अतिशय गरजेचं आहे. आपले शारीरिक आजार हे मानसिक आरोग्यावर अवलंबून असल्याचे तज्ज्ञांनी देखील मान्य केले आहे. अनेक शारीरिक आजारांचे कारण हा मानसिक ताण असू शकतो.

मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते?

पुरेशी झोप व भूक न लागणे, नकारात्मक विचार मनात येणे, उदासीन वाटणे इत्यादी घटक आपल्या मानसिक आरोग्यावर परिणामकारक ठरतात.

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे?

मानसिक स्वास्थ्य बिघडले असता आपले विचार अत्यंत नकारात्मक होण्याची शक्यता असते. नकारात्मक विचार हे रुग्णांसाठी डिप्रेशन किंवा हायपरटेन्शनचे कारक ठरू शकतात. त्यामुळे सतत सकारात्मक विचार आपण सुरु ठेवले पाहिजेत. आपल्या आजूबाजू;या सकारात्मक वातावरण तयार करणे अत्यंत गरजेचे आ

Leave a Comment