काही व्यक्ती सतत आजारी पडत असलेले आपल्याला दिसतात, त्यांना सतत ताप, सर्दी, खोकला यांनी ग्रासलेले असते. अशा व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती अत्यंत कमी असते. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपाय करणे अत्यंत महत्वाचे ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण काही घरगुती उपायांचा वापर देखील करू शकतो.
शरीरात अनेक वाईट विषाणू वाढून त्यामुळे रोग लागण होते. ती वाढू नये यासाठी रोगप्रतिकारशक्ती काम करते. परंतु आपल्या विचित्र जीवनशैलीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. अशावेळी आपली जीवनशैली सुधरवणे अत्यंत आवश्यक आहे. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपली नियमित दिनचर्या आरोग्यदायी असायला हवी.

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपाय: घरगुती
आपल्या घरात अशा अनेक गुणकारी वस्तू असतात ज्यामुळे आपण रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपाय म्हणून त्यांचा वापर करू शकतो. आपल्या दिनचर्येत सुधार आणल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. दिनचर्येत काही चांगल्या सवयी, पौष्टिक आहार, व्यायाम तसेच जीवनसत्व युक्त पदार्थांचा समावेश करावा. रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे…
१) तुळशीचं पाणी:
तुळशीचं रोप जवळजवळ सर्वच घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीरातील विषाणूंच्या हल्ल्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. रोज सकाळी तुळशीचे चार-पाच पानं पाण्यात उकळून घ्यावेत आणि ते पाणी प्यावे याने शरीर डिटॉक्स होण्यास देखील मदत होते. यावेळी तुळशीसह पुदिना आणि लिंबू वापरल्याने ते अधिक गुणकारी ठरू शकेल.
२) तूप आणि हळद:
तूप आणि हळद यांचं मिक्श्चर शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. तूप आणि हळद एकत्र करून दुधात मिसळून ते प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
३) अश्वगंधा:
अश्वगंधामध्ये नैसर्गिक अॅडाप्टोजेन्स असतात जे शरीरातील हार्मोन्स बॅलेन्स करण्यात मदत करते तसेच शरीरावरील ताणतणाव दूर करण्यास देखील याचा उपयोग होतो.
४) मसाले:
हिंग, मिरी, धने हे मसाले आपल्या शरीरात पचनसंस्थेवर काम करत असतात. हे मसाले शरीरातील इंफ्लिमेशन कमी करतात. हे मसाले कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
५) फ्लेक्ससीड्स:
फ्लेक्ससीड्स म्हणजेच आळशी शरीरातील विषारी विषाणूंशी लढण्यास प्रतिकारशक्ती वाढवते. यांचा आपल्या नियमित आहारात समावेश करणे उत्तम आरोग्यासाठी योग्य ठरेल.
६) निरोगी अन्न:
आपला कल सध्या बाहेरील जंक फूडकडे असतो, परंतु ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत असते. आपल्या जीवनशैलीत निरोगी अन्नाचा समावेश करावा. आपल्या आहारात फळे, पालेभाज्या, सेंद्रिय धान्य, दूध असे मिनरल्स, फायबर्स आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा वापर करावा. यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती सुधारते.
७) व्यायाम:
शरीर नियमित कार्यान्वित असायला हवे. शरीराची हालचाल होत नसल्यास त्याचे परिणाम अत्यंत वाईट असू शकतात. अनेक रोग आपल्यास उद्भवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नियमित व्यायाम ही अत्यंत उत्तम जीवनशैली आहे. आपल्या रोजच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करणे हे उत्तम आरोग्याचे प्रमाण आहे.
८) मद्यपान, धूम्रपान टाळा:
मद्यपान अथवा धूम्रपान आपल्या शरीराला अशक्त बनवू शकतं. आपल्या शरीरासाठी हे घटक अत्यंत हानिकारक ठरतात त्यामुळे मद्यपान, धूम्रपान टाळण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मद्यपान व धूम्रपान करण्याच्या सवयीनपासून दूर राहणे हा रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपाय ची पहिली पायरी आहे.
९) पुरेशी झोप:
रोजच्या कामामुळे शरीर आणि मेंदू दोघांनाही आरामाची गरज असते, त्यामुळे पुरेशी झोप ही निरोगी राहण्यास अत्यंत महत्वाची ठरते. रात्री १० ते २ ही वेळ गाढ झोपेची असल्यामुळे या वेळेत झोप घेणे आवश्यक आहे. शरीराला किमान ७ ते ८ तासांची झोप गरजेची असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
१०) व्हिटॅमिनयुक्त पदार्थ:
शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता झाल्यास शरीर कमजोर पडण्याची शक्यता आहे. शरीरात व्हिटॅमिन A, B, C, D, E हे सर्व प्रकार अगदी संतुलित असल्यास शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे आपल्या आहारात व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. लिंबू, संत्री, मोसंबी, सुका मेवा, मासे, अंडी, चणे या सर्व पदार्थांमध्ये विशिष्ट व्हिटॅमिन असतात जे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. तसेच प्रोबायोटिक्स, झिंक, फायबर, आयर्न आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ देखील आपल्या आहारात समाविष्ट केल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती लवकरात लवकर सुधारण्यास मदत होते
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जेवणात कोणते पदार्थ असावेत?
शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता झाल्यास शरीर कमजोर पडण्याची शक्यता आहे. शरीरात व्हिटॅमिन A, B, C, D, E हे सर्व प्रकार अगदी संतुलित असल्यास शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे आपल्या आहारात व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. लिंबू, संत्री, मोसंबी, सुका मेवा, मासे, अंडी, चणे या सर्व पदार्थांमध्ये विशिष्ट व्हिटॅमिन असतात जे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. तसेच प्रोबायोटिक्स, झिंक, फायबर, आयर्न आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ देखील आपल्या आहारात समाविष्ट केल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती लवकरात लवकर सुधारण्यास मदत होते.
मद्यपान, धूम्रपान यांचा काय परिणाम होतो?
मद्यपान अथवा धूम्रपान आपल्या शरीराला अशक्त बनवू शकतं. आपल्या शरीरासाठी हे घटक अत्यंत हानिकारक ठरतात त्यामुळे मद्यपान, धूम्रपान टाळण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मद्यपान व धूम्रपान करण्याच्या सवयीनपासून दूर राहणे हा रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपाय ची पहिली पायरी आहे.
रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी घरगुती उपाय कोणते?
आपल्या घरात अशा अनेक गुणकारी वस्तू असतात ज्यामुळे आपण रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उपाय म्हणून त्यांचा वापर करू शकतो. आपल्या दिनचर्येत सुधार आणल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. दिनचर्येत काही चांगल्या सवयी, पौष्टिक आहार, व्यायाम तसेच जीवनसत्व युक्त पदार्थांचा समावेश करावा.