उच्च रक्तदाब ही समस्या जास्तीत जास्त वृद्ध वर्गामध्ये आढळली जात होती, परंतु आता ही समस्या इतकी सामान्य झाली आहे की २०-२२ वर्षाच्या मुलांमध्ये देखील उच्च रक्तदाब ही समस्या दिसून येते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला जर याची लक्षणं भासत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.
आजकाल मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, हृदयविकार हे रोग अतिशय सामान्य वाटत आहेत. कारण आपल्याला भेटणाऱ्या व्यक्तींपैकी अनेकांकडून आपण त्यांना हे रोग असल्याचे ऐकतो. आता तर हे रोग अगदी लहान मुलांना देखील उद्भवत आहेत. आणि हे रोग आयुष्यभर सोबत राहतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रण मिळवणं अत्यावश्यक ठरत आहे.
उच्च रक्तदाब म्हणजे काय?
आपलं हृदय धडधडत असतं आणि आपल्या संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करत असतं. रक्तपुरवठा होतानाचा साधारण वेग १२०/८० मिलीमीटर असा असतो. १२०/८० ते १३९/८९ मिलीमीटर हा रक्ताभिसरणाचा सामान्य वेग मानला जातो. वयोमानानुसार या वेगाचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. हा वेग वाढल्यास त्याला उच्च रक्तदाब असे म्हटले जाते.
उच्च रक्तदाब का होतो?

१) मीठ:
काहींना जेवणावर भरपूर मीठ मिसळण्याची सवय असते. मीठ योग्य प्रमाणात असले तरी काही लोक जेवताना वरून मीठ टाकतात. मीठ जास्त खाल्ल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते आणि साहाजिकच किडन्यांमध्ये पाणी साचते आणि रक्तामध्ये विविध प्रकारचे द्रव मिसळून रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो आणि उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
२) ताण:
रक्तदाब वाढीचा सर्वात मोठा कारक म्हणजे ताण. आपल्या आयुष्यात अनेक कारणांमुळे ताण येण्याची शक्यता असते. शारीरिक, मानसिक, भावनिक ताण या अनेक वेदनांमधून आपण जात असतो. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपला ताण कमी होणे गरजेचे आहे. यासाठी आपण रोजच्या कामातून स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. बाहेर फिरायला जावं, कुटुंबासोबत गप्पा माराव्या, मित्रांसोबत हिंडावं म्हणजे आपल्या मनावरील ताण हलका होऊन आपण पुन्हा रोजची कामं करण्यास सज्ज होतो.
३) धूम्रपान आणि मद्यपान:
रक्तदाब वाढीचे धूम्रपान आणि मद्यपान ही दोन कारणं देखील आहेत. यामध्ये असे काही विषारी घटक असतात जे आपल्या शरीरासाठी परिणामकारक ठरतात. सिगारेटमध्ये निकोटीन नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब उद्भवू शकतो.

४) लठ्ठपणा:
वाढलेले वजन हे देखील उच्च रक्तदाबाचे कारण ठरते. रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी वजनावर नियंत्रण करणे आवश्यक आहे. आपला लठ्ठपणा हा आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये फॅटी टिशूजचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे उच्च रक्तदाब उद्भवतो.
५) शरीर सुस्त असणे:
शरीराची हालचाल झाल्यास आपल्या हृदयाचे कार्य अगदी योग्यरीत्या होत असते परंतु शरीर सुस्त असेल, त्याची हालचाल होत नसेल तर मात्र याचा परिणाम थेट हृदयावर होऊ शकतो. आपल्या सुस्तीमुळे शरीरातील काही भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही. परंतु जर आपले शरीर नियमित कार्यान्वित असेल तर मात्र शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत रक्त पोहोचते आणि रक्तदाब नियंत्रण आपोआप होते.
रक्तदाब नियंत्रण का करावे?
डॉक्टरांच्या मते, उच्च रक्तदाब हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे. हृदयविकार, किडनीशी संबंधित आजार, अंधत्व, स्मृतीभ्रंश अशा आजारांचं मूळ कारण उच्च रक्तदाबात आहे. त्यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होण्यापूर्वी काळजी घेतली, तर अनेक समस्या टळू शकतात. आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल केले, तर रक्तदाब आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या इतर समस्यांवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं.
रक्तदाब नियंत्रण उपाय:
१) पौष्टिक आहार:
रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी कमी तेलकट आणि कमी साखरेचे पदार्थ खाणे. फळे, भाज्या, साबुदाणा, ओट्स, आणि कमी फॅट्स असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा.

२) नियमित व्यायाम:
सकाळी लवकर उठून नियमित व्यायाम केल्याने रक्तदाबावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. सकाळच्या वातावरणात शरीरात ऑक्सिजन भरून घेऊ शकतो ज्यामुळे आपल्या हृदयाला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होईल आणि हृदय देखील तंदुरुस्त राहील.
३) ताण कमी करणे:
आपल्या नियमित जीवनात आपल्यावर असलेला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून रक्तदाब नियंत्रित राहील आणि उच्च रक्तदाब समस्येपासून आपण दूर राहू.
४) मीठ कमी खाणे:
आपल्या जेवणात वापरले जाणाऱ्या मिठावर नियंत्रण ठेवा म्हणजे रक्तदाब नियंत्रण आपोआप होईल. मिठामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे या समस्या उद्भवतात.
५) चांगली झोप:
रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगली व शांत झोप मिळणे गरजेचे आहे. यासाठी वेळेत झोपणे देखील महत्वाचे आहे. यामुळे आपले आरोग्य सुदृढ होईल.

उच्च रक्तदाबाचे कारण काय?
उच्च रक्तदाब मीठ जास्त खाल्ल्याने, लठ्ठपणा, सुस्ती, शरीर कार्यान्वित नसणे, जास्त ताण, धूम्रपान, मद्यपान यामुळे उद्भवतो.
रक्तदाब किती असावा?
आपलं हृदय धडधडत असतं आणि आपल्या संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करत असतं. रक्तपुरवठा होतानाचा साधारण वेग १२०/८० मिलीमीटर असा असतो. १२०/८० ते १३९/८९ मिलीमीटर हा रक्ताभिसरणाचा सामान्य वेग मानला जातो. वयोमानानुसार या वेगाचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. हा वेग वाढल्यास त्याला उच्च रक्तदाब असे म्हटले जाते.
रक्तदाब नियंत्रित का करावं?
डॉक्टरांच्या मते, उच्च रक्तदाब हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे. हृदयविकार, किडनीशी संबंधित आजार, अंधत्व, स्मृतीभ्रंश अशा आजारांचं मूळ कारण उच्च रक्तदाबात आहे. त्यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होण्यापूर्वी काळजी घेतली, तर अनेक समस्या टळू शकतात. आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल केले, तर रक्तदाब आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या इतर समस्यांवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं.